
अमेरिकेतील जॉर्जिया येथील लष्करी तळावर अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना बुधवारी घडली. या गोळीबारात पाच अमेरिकन सैनिक जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच लष्कर, पोलीस, अग्नीशमन दल, रुग्णवाहिका आणि मदत यंत्रणांची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत.
हा हल्ला कुणी आणि कोणत्या कारणातून याबाबत अद्याप माहिती समजू शकली नाही. फोर्ट स्टीवर्ट हा अमेरिकेतील एक महत्त्वाचा लष्करी तळ आहे. येथे मोठ्या संख्येने सैनिक तैनात आहेत. ही घटना लष्कराच्या अंतर्गत सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. घटनेबाबत आतापर्यंत लष्कर किंवा पोलिसांनी कोणतेही सविस्तर अधिकृत विधान जारी केलेले नाही.