गुन्हे वृत्त- परीक्षा केंद्रात नेला मोबाईल; विद्यार्थ्याविरोधात गुन्हा

महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत विद्यार्थ्याने गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. बंदी असतानादेखील विद्यार्थ्याने मोबाईल परीक्षा पेंद्रात नेला. घडल्याप्रकरणी पवई पोलिसांनी एका विद्यार्थ्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.  

पवई परिसरातील आयटी पार्कमध्ये एका पंपनीच्या माध्यमातून सरकारी परीक्षा घेतल्या जातात. नुकतेच महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या वतीने शनिवारी परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षा पेंद्रात मोबाईल नेण्यास बंदी असतानाही एका विद्यार्थ्याजवळ मोबाईलसारखे असल्याचे पर्यवेक्षक याच्या लक्षात आले. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांची चौकशी केली. त्याच्याकडे मोबाईल आढळला व त्यात पीसीचे 17 फोटो आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

मंदिरात चोरी करणारी दुकली गजाआड

जैन मंदिरात चोरी करणाऱ्या दोघांना सांताक्रुझ पोलिसांनी अटक केली. सुशान मिरिधा आणि प्रभुदेवा खारवार अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  

विलेपार्ले पश्चिम येथील एका सोसायटीत जैन मंदिर आहे. त्या मंदिरात आदिनाथ भगवान, सुमतीनाथ भगवान, महावीर स्वामी भगवान, पार्श्वनाथ भगवान यांच्या सोने आणि चांदीच्या मूर्ती आहेत. कोणी खोडसाळ करू नये म्हणून दुपारी साडेबारा ते साडेपाच आणि रात्री साडेआठ ते पहाटे सहा दरम्यान मंदिराच्या लोखंडी स्लायडिंगला लॉक लावले जाते.  

गेल्या महिन्यात तक्रारदार यांचे वडील मंदिरात पूजेसाठी गेले होते. तेव्हा त्यांना मंदिराचा लाकडी दरवाजा उघडा दिसला. लोखंडी स्लायडिंगचे गेट उघडे दिसले. आत जाऊन पाहणी केली असता महावीर स्वामी याची चांदीची मूर्ती आणि मंदिरातील इतर वस्तू अशा 8 लाख 34 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. घडल्या प्रकाराची माहिती सांताक्रुझ पोलिसांना दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश शिंदे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे, सहायक निरीक्षक संजय कल्हाटकर, उपनिरीक्षक प्रकाश राठोड, केणी, सालदूरकर, हिरेमठ, माने, दिवाणजी, काकडे आदीच्या पथकाने तपास करून दोघांना अटक केली.

जुन्या वादातून तरुणाची हत्या, विलेपार्ले येथील घटना  

जुन्या वादातून तरुणाची हत्या झाल्याची घटना आज विलेपार्ले परिसरात घडली. कृष्णा मडास्वामी असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी परमेश देवेंद्र उर्फ परमेश्वर आणि किसन देवेंद्र ला जुहू पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. कृष्णा, परमेश आणि किसन हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरोधात जुहू पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.  

कृष्णा हा विलेपार्ले च्या नेहरू नगर झोपडपट्टीत राहत होता. तर किसन आणि परमेश देखील त्याच परिसरात राहतात. गेल्या काही दिवसापासून कृष्णा आणि परमेश यांच्यात वाद सुरू होते. त्यावरून त्याच्यात खटके उडायचे. आज सकाळी कृष्णा हा नेहरूनगर येथील एका दुकानाजवळ बसला होता. तेव्हा तेथे परमेश आणि किसन हे दोघे आले. तेथे त्याच्यात जुन्या कारणावरून वाद झाला.