
गाझाच्या अल शिफा रुग्णालयात इस्रायलने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात अल जझीराचे 5 पत्रकार ठार झाले. मृतांमध्ये अनस अल-शरीफ, मोहम्मद कारीकेड, कॅमेरामन इब्राहिम झहीर, मोआमेन अलिवा आणि मोहम्मद नौफल यांचा समावेश आहे. हे सर्व पत्रकार रुग्णालयाबाहेर पत्रकारांसाठी उभारलेल्या तंबूत राहत होते.
हल्ल्यात एकूण 7 जणांचा मृत्यू झाला. इस्रायली सैन्याचे मुख्य लक्ष्य पत्रकार अनस अल शरीफ होते. अनस हा हमासमधील दहशतवादी सेलचा प्रमुख म्हणून काम करत होता. त्याचे काम इस्रायली नागरिक आणि सैनिकांवर रॉकेट हल्ले करणे होते, असा दावा इस्रायलने केला आहे.