
- तुमच्या घरातील स्मार्ट टीव्हीचा स्क्रीन खराब झाला आहे, असे वाटत असेल तर काय कराल, यासाठी काही टिप्स या ठिकाणी देत आहोत.
- सर्वात आधी टीव्हीचा स्क्रीन खराब झाला असेल तर तो वॉरंटीमध्ये आहे का, हे तपासून घ्या. जर असेल तर तत्काळ संबंधितांशी संपर्क साधा.
- जर तुमचा टीव्ही वॉरंटीमध्ये नसेल आणि दुरुस्तीचा खर्च जास्त येत असेल तर नवीन टीव्ही खरेदी करणे हा चांगला उपाय आहे.
- कधी कधी दुरुस्तीचा खर्च नवीन टीव्हीच्या किमती इतका असू शकतो. त्यामुळे स्क्रीन दुरुस्तीसंबंधी विचारपूर्वक निर्णय घ्या.
- तुमचा स्मार्ट टीव्ही किती वर्षांपूर्वी घेतलेला आहे, हे आधी तपासून घ्या. नवीन टीव्ही लवकर खराब झाला असेल तर कंपनी बदला.