
सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकार, एमसीडी, एनडीएमसी, एनसीआरमधील प्रशासकीय यंत्रणांना शहरातील रस्ते आणि गल्लीबोळांना भटक्या कुत्र्यांच्या जाचापासून मुक्त करण्याचे आदेश दिले. या सर्व ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना हटवण्यात यावे आणि डॉग शेल्टर होममध्ये ठेवण्यात यावे, तसेच या संस्थांनी पुढच्या आठ आठवड्यांमध्ये पाच हजार कुत्र्यांना पकडून सुरुवात करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. भटक्या श्वानाविरोधातील कारवाईत किंवा या कामात कुठली व्यक्ती किंवा संस्थेने अडथळा आणला तर कोर्टाला सांगा, कोर्ट त्यांच्यावर कारवाई करेल, असा सक्त इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.