
प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देत इलॉन मस्क यांनी आपले एआय टुल ‘ग्रोक’ सर्वांसाठी फ्री केले आहे. यानिमित्ताने मस्क यांनी युजर्सला शानदार गिफ्ट दिले आहे. सध्या मर्यादित काळासाठी ग्रोक फ्री करण्यात आलेय. एक्सएआयने नुकतीच याबाबतची घोषणा केली. अलीकडेच लाँच झालेल्या ‘जीपीटी5’ ला तगडी टक्कर देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. एक्सएआयने एक्सवर पोस्ट करत म्हटलेय की, ग्रोकमध्ये ऑटो मोडचा वापर करा. आपोआप तुमचे प्रश्न ग्रोक4 वर जातील. तसे नको असेल तर एक्सपर्ट पर्याय निवडूनही तुम्हाला ग्रोक3 चा पर्याय निवडता येईल. तज्ञांचे म्हणणे आहे की, चॅटजीपीटीवर नाराज असलेल्या लोकांना आपल्याकडे वळवण्यासाठी इलॉन मस्क यांनी ग्रोक सेवा फ्री केली आहे. अलीकडेच चॅटजीपीटी 5 लाँच झाले. मात्र हे व्हर्जन पहिल्यासारखे नसून संवाद साधताना सावधगिरी बाळगत असल्याच्या तक्रारी येत आहेत. चॅटजीपीटीचे ग्राहक तोडण्यासाठी स्पर्धक कंपन्यांना संधी मिळाली आहे.