
हिंदुस्थानात ऑनलाईन शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे. मात्र अमेरिका आणि चीनच्या तुलनेत हिंदुस्थानात ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण खूप कमी आहे. एका अहवालानुसार, देशात 85 कोटी लोक इंटरनेटचा वापर करतात. त्यापैकी केवळ 20 ते 25 टक्केच लोक ऑनलाईन खरेदी करतात. अमेरिका आणि चीनमध्ये ही संख्या 85 टक्क्यांहून अधिक आहे. हिंदुस्थानात किरकोळ खर्चात ऑनलाईनचा हिस्सा फक्त 7 ते 9 टक्के आहे. ऑनलाईन खरेदीत हिंदुस्थानात टॉप 25 देशांच्या यादीतही नाही. ऑनलाईन शॉपिंगमध्ये अमेरिका सर्वात पुढे आहे. दुसऱया क्रमांकावर चीन आहे. या यादीत तिसऱया स्थानावर ब्रिटन, तर चौथ्या स्थानावर दक्षिण कोरिया आहे.