
रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी हे देशात सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. हुरून इंडियाच्या 2025 च्या मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेसच्या यादीत अंबानी कुटुंबाने पहिले स्थान पटकावले आहे. त्यांच्याकडे व्यवसायाचे मूल्यांकन 28 लाख कोटी रुपये आहे. दुसऱया स्थानावर कुमार मंगलम बिर्ला कुटुंब आहे. त्यांच्याकडे व्यवसायाचे मूल्यांकन 6.5 लाख कोटी रुपये आहे. तिसऱया स्थानावर जिंदाल कुटुंब असून त्यांचे व्यवसाय मूल्यांकन 5.7 लाख कोटी रुपये झाले आहे. या यादीत 100 नवीन कुटुंबे जोडली गेली, ज्यामुळे एकूण कुटुंबांची संख्या 300 झाली आहे. या सर्वांचे एकूण मूल्यांकन 1.6 ट्रिलियन म्हणजेच 134 लाख कोटी रुपये झाले आहे. ही 300 कुटुंबे रोज हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेत 7 हजार 100 कोटी रुपयांचे योगदान देतात. तसेच दरवर्षी देशाला 1.8 लाख कोटींचा कर देतात.