अकरावीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आता विशेष फेरी, यादी 19 ऑगस्टला

राज्यातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आता विशेष फेरी राबवण्यात येणार आहे. या फेरीची निवड यादी 19 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार असून राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये अकरावीचे वर्ग सुरू झाल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.

बुधवारपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी आणि भाग एकमध्ये दुरुस्ती करता येणार आहे. 14 ऑगस्ट रोजी विशेष फेरीसाठीच्या रिक्त जागा संकेतस्थळावर प्रदर्शित केल्या जाणार आहेत, तर 19 ऑगस्ट रोजी विशेष फेरीची निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे.