मावशी बनली वैरी; कल्याणमधील चिमुकलीची हत्या करून मृतदेह कर्जतला फेकला, कोळसेवाडी पोलिसांनी केला खुनाचा उलगडा

कल्याणमधील चार वर्षांच्या चिमुकलीची मावशी आणि तिच्या पतीने हत्या करून कर्जत तालुक्यातील एका निर्जन ठिकाणी मृतदेह फेकून दिला. मावशीच वैरी बनल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला असून १० महिन्यांनंतर या प्रकरणाचा छडा लागला. पोलिसांनी याप्रकरणी नेरळमधून प्रथमेश उर्फ अमर कांबरी आणि अपर्णा कांबरी या आरोपींना अटक केली आहे.

मृत मुलीचे आई-वडील वेगळे राहतात. त्यामुळे पीडित मुलीला रायगड जिल्ह्यातील कर्जत भिवपुरी चिंचवली येथे राहणाऱ्या मावशीने सांभाळण्यासाठी आपल्याकडे ठेवले होते. मात्र चिमुकली सतत पँटमध्ये शौच करत असल्याने एके दिवशी मावशीने बेदम मारहाण केली. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. यानंतर मुलीचा मृतदेह एका गादीमध्ये गुंडाळून कर्जत-कल्याण राज्य मार्गावर फेकून दिला होता. कोळसेवाडी पोलिसांनी नेरळ पोलिसांच्या मदतीने घटनास्थळावरून मृत मुलीची जळालेल्या अवस्थेतील हाडे हस्तगत केली. हे अवशेष फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांनी दिली.

आत्यामुळे गुन्ह्याला वाचा फुटली

खून केल्याची कबुली मावशी आणि तिच्या कल्याण येथील पीडित मुलीच्या आत्याने ऑक्टोबर २०२४ मध्ये फोन करून मुलीची चौकशी केली असता कांबरी कुटुंब काहीच माहिती देत नव्हते. मुलीला फोनवर बोलून दिले जात नव्हते. यामुळे शंका आल्याने आत्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर पोलिसांनी अपर्णा आणि तिच्या पतीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिचा पतीने दिली.