
आपली त्वचा सुंदर दिसावी याकरता आपण नानाविध प्रयत्न करत असतो. चेहऱ्याची काळजी घेताना विविध फेस पॅकचा वापर आपण करतो. परंतु प्रत्येक वेळी हे फेसपॅक उपयोगी पडतातच असे नाही. घरगुती उपायांनी चमक मिळवायची असेल तर गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेला फेस पॅक वापरा. गुलाबाच्या पाकळ्यांपासून फेस पॅक कसा बनवायचा ते आपण जाणून घेऊया.
गुलाब पाकळ्यांचा फेसपॅक
– गुलाबाच्या पाकळ्या
– मुलतानी माती
– मध
– कोरफडीचा जेल
Skin Care – चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी ‘ही’ वस्तू लावा, वाचा
फेस पॅक कसा बनवायचा?
फेस पॅक बनवण्यासाठी प्रथम सुक्या गुलाबाच्या पाकळ्या घ्या आणि नंतर त्या चांगल्या प्रकारे कुस्करून घ्या किंवा मिक्सर ब्लेंडरमध्ये टाका आणि पावडर बनवा. आता कोरफडीचा गर घ्या, त्यात मुलतानी माती पावडर घाला आणि ते चांगले मिसळा. नंतर यात मध चांगले मिसळा. गुळगुळीत पेस्ट बनवल्यानंतर हा फेसपॅक चेहऱ्यावर लावू शकता.
फेस पॅक कसा लावायचा?
हा फेस पॅक लावण्यासाठी, चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. नंतर मालिश करताना या पॅकचा पातळ थर चेहऱ्यावर लावा. आता त्यावर दुसरा थर लावा. चांगले वाळल्यानंतर, टिश्यू ओला करा आणि नंतर त्याद्वारे चेहरा स्वच्छ करा. हा फेस पॅक चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकून त्वरित चमकदार त्वचा मिळविण्यास मदत करतो. तुमच्या चेहऱ्यावर टॅनिंग झाले असले तरी, हा फेस पॅक लावणे फायदेशीर ठरू शकते.
Beauty Tips- रात्री झोपताना चेहऱ्याला ‘हे’ तेल लावल्याने मिळतील खूप सारे फायदे, वाचा