Kishtwar Cloudburst – किश्तवाडमधील ढगफुटीतील मृतांचा आकडा 38 वर, दोन जवानांचा देखील समावेश

जम्मू कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चशोटी परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या ढगफुटीमुळे आतापपर्यंत 38 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये CISF जवानांचा देखील समावेश आहे.

किश्तवाडमधील माचैल माता मंदिरात आजपासून यात्रेला सुरुवात झाली होती. त्यामुळे शेकडो भाविक या मंदिर परिसरात होते. त्याचवेळी येथे ढगफुटीसदृष्य पाऊस झाला व अचानर पूर आला. पूरात या भागातील शेकडो घरे व वाहने वाहून गेली आहेत. ढगफुटीनंतर या भागात तत्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले. आतापर्यंत घटनास्थळावरून 38 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे तर 80 हून अधिक जणांना वाचवण्यात आले आहे. अद्याप शेकडो लोकं बेपत्ता असल्याचे समजते.