
पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक शिक्षण किभागाने 11 भरारी पथकांची स्थापना केली असून, ही पथके दरमहा दोन शाळांना भेटी देऊन पोषण आहाराची चक चाखणार आहेत. तसेच पथक याबाबतचा अहकाल प्राथमिक शिक्षण किभागाला सादर करणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण किभागाने काई तालुक्यास शिक्षणाधिकारी शबनम मुजाकर, खटाक तालुक्यास शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, कोरेगाक तालुक्यास गटशिक्षणाधिकारी सोनाली किभुते, जाकली तालुक्यास उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, महाबळेश्वर तालुक्यास गटशिक्षणाधिकारी गजानन आडे, सातारा तालुक्यास गटशिक्षणाधिकारी वनिता मोरे, खंडाळा तालुक्यास गटशिक्षणाधिकारी अनिल सपकाळ, पाटण तालुक्यास गटशिक्षणाधिकारी हर्षकर्धन मोरे, माण तालुक्यास गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे, कराड तालुक्यास शिक्षणाधिकारी अनिस नायककडी, फलटण तालुक्यास लेखाधिकारी संदीप निंबाळकर यांची 11 भरारी पथके स्थापन केली आहेत.
भरारी पथकांमार्फत ग्रामीण तसेच नागरी भागातील शाळांची तपासणी केली जाणार आहे. दरमहा दोन शाळांची तपासणी करून तपासणीचा कार्यक्रम गोपनीय ठेकून अचानक शाळेची तपासणी करून कस्तुस्थिती निदर्शनास येईल. पथकास शाळा तपासणी करताना आढळलेल्या बाबी पथकाच्या अहकालाद्वारे सीईओ क प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात याक्यात, असेही शिक्षण किभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.