
परभणी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपल्याने नदीला पूर आला आहे. आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी वडगाव या गावांचा पुरामुळे संपर्क तुटला असून गावामध्ये कुठलीही वैद्यकीय सेवा उपलब्ध नाही. तीनही नद्यांचे पाणी पुलावरून वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक दहा या रस्त्यावरील पुलाची निविदा मंजूर असून कंत्राटदाराने अद्यापही काम सुरू केले नसल्याने गावकऱ्यांचा सार्वजनिक बांधकामात विभागाच्या कारभारावर रोष आहे. गेल्या वर्षी गावाचा संपर्क तुटल्यामुळे उपचाराअभावी एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळत नसल्यामुळे मृत्यूस जबाबदार कोण ?असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
- शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्यामुळे कातनेश्वर महसूल मंडळात अतोनात नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यास दिरंगाई करू नये .
(सोपान मोरे सामाजिक कार्यकर्ते)