विमानतळावरून 8 कोटी 56 लाखांचा गांजा जप्त

फूड पॅकेटच्या आड हायड्रोपोनिक गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभाग (एआययू)ने अटक केली. मोहम्मद स्वैल आणि समीर खान अशी त्या दोघांची नावे असून ते दोघे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. त्याच्याकडून जप्त केलेल्या गांजाची किंमत सुमारे 8 कोटी 56 लाख 20 हजार रुपये इतकी आहे.

विमानतळावर अमली पदार्थ तस्करीचे प्रकार होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली आहे. शनिवारी मोहम्मद आणि समीर हे दोघे बँकॉक येथून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले. त्या दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्या दोघांना ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची तपासणी केली. बॅगेत सहा खाऊची पाकीट आढळून आली. त्या पाकिटाची तपासणी केल्यावर त्यात गांजा असल्याचे आढळून आले. त्या दोघांकडून 8 कोटी 56 लाखांचा गांजा जप्त केला.

दोघांना अटक

एआययूने मोहम्मद आणि समीरविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंद केला. ते दोघे थायलँड येथून बँकॉकला आले. बँकॉक येथून विमानाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्याचे त्याने एआययूच्या अधिकाऱ्यांना सांगितले. त्या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले होते.