सिंधुदुर्गात धुवांधार पाऊस, जनजीवन विस्कळीत 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवस धुंवाधार पाऊस कोसळत आहे. संतप्तधार पावसाची रिपरिप असल्याने जिल्ह्यातील नद्या नाल्यांना पुरस्थिती प्राप्त झाली आहे.सह्याद्री पट्टयात गेले 4 दिवस तुफान पाऊस झाल्याने ही पुरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असल्याने बरेच ग्रामीण रस्ते व राज्यमार्ग पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
कणकवली आचरा मुख्य मार्गावर उर्सुला स्कुल नजीक गडनदीचे पाणी भरल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. आचराकडे जाणारी वाहतूक बिडवाडी मार्गे वळवण्यात आली आहे.  तसेच शिवडाव परबवाडी येथे पाणी भरल्यामुळे वाहतूक  कळसुली झोपडी मार्गे वळवण्यात आली आहे .
आजगनी रस्त्यावर सातरल कासरल येथे पाणी भरल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. या रस्त्यावरील वाहतूक ताटरभाव मार्गे वळवण्यात आलेली आहे तसेच कणकवली तालुलक्यात भिरवंडे रामेश्वर मंदिराच्या पुढील मोरीवर पाणी भरल्यामुळे, जनजीवन विस्कळीत झाले आहे.