AI च्या माध्यमातून तयार झालेला पहिला चित्रपट ‘चिरंजीवी हनुमान- द एटरनल’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

हिंदुस्थानी प्रॉडक्शन हाऊस अबंडंटिया एंटरटेनमेंटने कलेक्टिव्ह मीडिया नेटवर्कच्या हिस्ट्रीव्हर्स डिव्हिजनच्या सहकार्याने पहिला AI चित्रपट तयार केलेला आहे. हिंदुस्थानात बनवलेला हा पहिला AI निर्मित, थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यास आता सज्ज झालेला आहे. हा चित्रपट हिंदू हनुमानाच्या कथेवर केंद्रित आहे. “चिरंजीवी हनुमान – द एटरनल” नावाच्या या AI  चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता जाहीर करण्यात आली आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे की, “चिरंजीवी हनुमान – द एटरनल” च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. तरण यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मोठ्या पडद्यावर हनुमानाची दिव्य कथा – AI संचालित चित्रपट ‘चिरंजीवी हनुमान’ 2026 मध्ये हनुमान जयंतीला प्रदर्शित होणार आहे.

“चिरंजीवी हनुमान – द इटरनल” ची निर्मिती पवित्र महाकाव्ये आणि रामायण सारख्या प्रतिष्ठित पौराणिक ग्रंथांपासून प्रेरित आहे. तसेच या चित्रपटात AI चा वापर करण्यात आलेला आहे. या निर्मितीचे दिग्दर्शन ५० हून अधिक अभियंत्यांच्या टीमद्वारे केले जात आहे. हा पहिला वहिला AI च्या माध्यमातून तयार झालेला चित्रपट असणार आहे.