Hair Care – केसगळतीवर लिंबाचा वापर कसा करायला हवा, वाचा

केसगळती ही समस्या दिवसागणिक भेडसावु लागली आहे. केसगळतीमुळे सौंदर्यातही बाधा येते. म्हणुनच केसगळतीची सुरुवात झाल्यावरच त्यावर उपाय करणे हे गरजेचे आहे. केसगळतीवर कोणतेही महागडे केमिकलचे उपाय करण्यापेक्षा, साधे सोपे उपाय केव्हाही हितावह ठरतात.

महिलांच्या सौंदर्यामध्ये केसांचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे. अनेकदा धुळीमुळे, प्रदुषणामुळे केस गळणे, कोरडे पडण्यास सुरुवात होते. केसांचे आरोग्य हे मुख्यतः आपण काय आणि कोणता आहार घेतो यावर अवलंबून असते. केसांची काळजी घेण्यासाठी तेलाचा उपयोग खूप मोलाचा मानला जातो. तेलाच्या जोडीने आपल्या घरातील अगदी सहज उपलब्ध असलेले केसांच्या त्वचेसाठी आवश्यक असणारे पदार्थही खूप महत्त्वाचे आहेत. साधे घरगुती उपाय आपण अमलात आणून केसांचे आरोग्य चांगले ठेऊ शकतो. केसांना सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून आपण  मास्क लावून केसगळती थांबवू शकतो. घरगुती उपाय केसांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी खूप उपयोगी पडतात.

Hair Care – केसगळतीकडे दुर्लक्ष करु नका, वाचा यामागील महत्त्वाची कारणे

केसगळतीवर साधे सोपे घरगुती उपाय खास तुमच्यासाठी

केसगळती रोखण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे लिंबू. एक कप कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळा. आंघोळीच्या आधी हे लिंबाचे मिश्रण केसांमध्ये व्यवस्थित लावा. त्यानंतर केस  20 ते 25 मिनिटांनंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

ऑलिव्ह ऑईलमध्ये थोडेसे दही मिसळा आणि केसांच्या मूळाशी लावावे. केसांना चमक आणण्यासाठी ऑलिव्ह तेल सर्वोत्तम पर्याय  आहे.

Hair Care – केसातील कोंड्यावर ‘हा’ आहे जालिम उपाय, वाचा

केसांचा चिकटपणा आणि तेलकटपणा घालविण्यासाठी लिंबाचा रस केसांच्या मूळाशी लावावा.  हा रस लावल्यानंतर किमान 15 मिनिटे तसाच ठेवावा. त्यानंतर केस स्वच्छ धुवावे.

केसांच्या आरोग्यासाठी दही सुद्धा खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये केसांसाठी आवश्यक असणारी खनिजे असतात. तसेच केसांचा कोरडेपणाही दह्याच्या वापराने दूर होतो. अंघोळ करण्याआधी केसांना किमान 10 मिनिटे दही लावून ठेवावे.