Mumbai Rains Updates – मुंबईत चार दिवसांत १,६४५ कोटी लिटर पावसाच्या पाण्याचा उपसा, BMC ची माहिती

मुंबईत पावसाचा जोर कायम आहे. अशातच मुंबई आणि परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याची माहिती समोर येत आहे. यातच मुंबईत १६ ऑगस्ट ते १९ ऑगस्ट २०२५ दुपारी १२ वाजेपर्यंतच्या चार दिवसांत तब्बल १,६४५.१५५ कोटी लिटर (१६,४५१.५५ दशलक्ष लिटर) पावसाच्या पाण्याचा उपसा सहा उदंचन केंद्रांमधून करण्यात आला आहे, अशी माहिती बीएमसीने दिली आहे. यासाठी ४३ पंपांनी एकूण ७६१ तास ३८ मिनिटे कार्यरत राहून ही कामगिरी केली.

उदंचन केंद्रांची माहिती:

१. ईर्ला: ८ पंप, ४८,००० लिटर/सेकंद, ३,७६८.४८ कोटी लिटर
२. क्लिव्हलँड बंदर: ७ पंप, ४२,००० लिटर/सेकंद, २,९०६.०२ कोटी लिटर
३. गजदरबंध: ६ पंप, ३६,००० लिटर/सेकंद, २,८७०.११ कोटी लिटर
४. लव्हग्रोव्ह: १० पंप, ६०,००० लिटर/सेकंद, २,८२६.५० कोटी लिटर
५. हाजी अली: ६ पंप, ३६,००० लिटर/सेकंद, २,३७९.७८ कोटी लिटर
६. ब्रिटानिया: ६ पंप, ३६,००० लिटर/सेकंद, १,७००.६० कोटी लिटर
एकूण: ४३ पंप, २,५८,००० लिटर/सेकंद, १,६४५.१५५ कोटी लिटर

मुंबईत सखल भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी बीएमसीने ५४० उदंचन पंप तैनात केले आहेत. आज, १९ ऑगस्ट रोजी शहरात अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली असून, गेल्या सहा तासांत या पंपांद्वारे १८२.५ कोटी लिटर पाण्याचा उपसा करण्यात आला आहे.