देशात यूपीआयद्वारे रोज 90 हजार कोटींचे व्यवहार

देशात यूपीआयच्या माध्यमातून रोज 90 हजार कोटींहून अधिक आर्थिक व्यवहार होत असल्याचे एसबीआयच्या अहवालातून समोर आले आहे. तर यूपीआयद्वारे सर्वाधिक आर्थिक देवाण-घेवाण महाराष्ट्रात होत असल्याचेही उघड झाले आहे. ऑगस्टमध्ये यूपीआयद्वारे एकूण 90 हजार 446 कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले. जानेवारी 2025 मध्ये यूपीआयद्वारे 75,743 कोटींचे व्यवहार झाले होते. तर जुलैमध्ये हाच आकडा 89,919 कोटी रुपये होता. नॅशनल पेमेंट्स काॅर्पोरेशन ऑफ इंडियाने राज्यनिहाय यूपीआय व्यवहारांची आकडेवारी जारी केली आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्र क्रमांक 1 वर आहे. जुलैमध्ये महाराष्ट्रातील यूपीआय व्यवहारांची भागीदारी तब्बल 9.8 टक्के इतकी राहिली तर कर्नाटकात हाच आकडा 5.5 टक्के राहिला.