गरीब देशांमध्ये औषधांवर अधिक खर्च, किमतीच्या बाबतीत 72 देशांमध्ये हिंदुस्थान 29वा

गरीब किंवा उत्पन्न कमी असलेल्या देशांमध्ये औषधांवर दरडोई भरमसाट खर्च होत असल्याचे समोर आले आहे. किंमतीच्या बाबतीत हिंदुस्थानचा क्रमांक 72 देशांमध्ये 29 वा आहे. तर पाकिस्तानात औषधे सर्वात स्वस्त आहेत. परंतु प्रत्यक्षात पाकिस्तान सरकार जनतेवर जर्मनीतील औषधांच्या किंमतीइतका खर्चाचा बोजा टाकत आहे. गरीब, मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांमधील लोकांना औषधांवर श्रीमंत देशांमध्ये औषधे ज्या किंमतीत मिळतात त्याहून भरमसाट खर्च करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठ आणि लंडन स्पूल ऑफ इकाॅनॉमिक्सने जगभरातील देशांमध्ये औषधांच्या किंमती आणि उपलब्धता यावर संशोधन केले आहे. या संशोधन अहवालात 72 देशांमधील 550 औषधांच्या किंमतीबाबतचा 2022 चा डेटा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अमेरिकनची क्षमता हिंदुस्थानपेक्षा 30 पट जास्त

अमेरिकेत औषधे महाग वाटत असली तरीही तेथील लोकांची दरडोई उत्पन्नाची क्षमता हिंदुस्थानपेक्षा तब्बल 30 पटींनी अधिक आहे. त्यामुळे तेथील लोकांना औषधे हिंदुस्थानच्या तुलनेत कमी वाटतात. जिथे हिंदुस्थानात औषधांवर 1 रुपया खर्च होतो तिथे अमेरिकेत दरडोई 30 रुपये खर्च करण्यात येतात.

मानसोपचार-हृदयरोगावरील औषधे महाग

मानसोपचार आणि हृदयरोगावरील औषधे सर्वाधिक महागडी आहेत. तर हॅपेटायटीस बी आणि सीवरील औषधे सर्वात स्वस्त आहेत. हिंदुस्थानात हॅपेटायटीस बी आणि एचआयव्ही/एड्सवरील औषधे खरेदी करण्यासाठी एका मजुराला जवळपास 10 दिवस काम करावे लागते.

जपानचे दरडोई उत्पन्न हिंदुस्थानपेक्षा 12 टक्क्यांनी अधिक

देश जीडीपी ट्रिलियन डॉलर दरडोई उत्पन्न

अमेरिका 30.51 75.64 लाख
चीन 10.23 11.61 लाख
जर्मनी 4.74 47.42 लाख
हिंदुस्थान 4.19 2.44 लाख
जपान 4.19 28.81 लाख