मुंबईकरांसाठी पदपथ नसणे हे धोकादायकच, हायकोर्टाने महापालिकेला फटकारले

पदपथांवर अतिक्रमण असेल तर नागरिक कसे चालू शकतील. पदपथ सोडून रस्त्यावर चालणे हे मुंबईकरांसाठी धोकादायकच आहे, असे उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले.

मुंबईतील पदपथांवरील अतिक्रमण हटवा. यासाठी विशेष पथक स्थापन करा, असे आदेश गेल्या महिन्यात न्यायालयाने पालिकेला दिले. त्यानुसार पालिकेने कारवाई सुरू केली. मात्र पवई येथील झोपडय़ा तोडल्यानंतर जय भीम नगर येथील काही जणांनी पदपथावर शेड बांधून वास्तव्य सुरू केले. यावरही पालिकेने बडगा उगारला. त्याविरोधात तेथील 23 जणांनी अर्ज केला होता. आधीच आमच्या झोपडय़ांवर कारवाई झाली आहे. आता पदपथावरील निवारा काढून घेऊ नका, अशी विनंती अर्जात करण्यात आली होती. न्या. गिरीश पुलकर्णी व न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर या अर्जावर सुनावणी झाली.