
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमिर झेलेन्स्की यांच्यासह युरोपियन महासंघातील नेत्यांची भेट घेतली. सुमारे 2 तास झालेल्या बैठकीत रशिया-युक्रेन युद्धाबाबत चर्चा झाली. हे युद्ध लवकरच थांबण्याची शक्यता व्यक्त करतानाच ट्रम्प यांनी आनंद व्यक्त केला. तसेच पुआठवड्यात पुतिन, झेलेन्स्की आणि स्वतः अशी त्रिपक्षीय चर्चा समोरासमोर बसून होईल. त्यासाठीची व्यवस्था करण्यात येत असल्याचेही ट्रम्प म्हणाले.
बैठकीत युक्रेनच्या सुरक्षा हमीवरही चर्चा झाली. अमेरिका आणि युरोपीय देश त्यावर एकत्रितपणे काम करतील, असे ट्रम्प म्हणाले. तसेच बैठक मधेच थांबवून पुतिन यांच्याशी तब्बल 40 मिनिटे फोनवरून चर्चा केली. यावेळी पुतिन यांनीही त्रिपक्षीय बैठकीचे समर्थन केल्याचे ट्रम्प यांनी नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. तर पुतिन पु15 दिवसांच्या आत झेलेन्स्की यांच्यासोबत बैठक घेण्यासाठी तयार असल्याचे जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मत्र्ज यांनी सांगितले.
व्हाईट हाऊसमध्ये विविध देशांच्या प्रतिनिधींची उच्चस्तरीय बैठक झाली बैठकीला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान केयर स्टार्मर, जर्मन चॅन्सलर फ्रेडरिक मर्त्ज, युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन आणि नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे उपस्थित होते.
युक्रेन 8 लाख कोटींची अमेरिकन शस्त्रास्त्रे खरेदी करणार
युक्रेन सुरक्षा हमीच्या बदल्यात युरोपियन महासंघाकडून मिळणाऱया तब्बल 90 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 8 लाख कोटी रुपयांचे अमेरिकन शस्त्रास्त्रे खरेदी करण्याची तयारी केल्याची माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितले
पुतिन बैठकीसाठी अटी घालू शकतात- झेलेन्स्की
पुतिन यांच्याशी बिनशर्त बैठक व्हावी अशी आमची इच्छा आहे. परंतु, पुतिन हे बैठकीसाठी अटी घालू शकतात, असे झेलेन्स्की बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. रशियाने युक्रेनसोबत द्विपक्षीय बैठक आणि नंतर त्रिपक्षीय बैठकीचाप्रस्ताव ठेवला. द्वीपक्षीय चर्चेसाठी आम्ही तयार आहोत. परंतु, पुतिन बैठकीसाठी अटी घालू शकतात. आम्हाला हे मान्य नाही कारण द्विपक्षीय आणि त्रिपक्षीय बैठक बनशर्त झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे, असे झेलेन्स्की म्हणाले.
पूर्वी शाब्दिक चकमक, यावेळी हसत खेळत बैठक
झेलेन्स्की यावेळी मिलिट्री ड्रेसऐवजी नॉर्मल कपडे परिधान करून बैठकीसाठी पोहोचले. यावरून ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांचे कौतुक केले. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती; परंतु यावेळी हसत खेळत बैठक झाली.