
दुधाची ओळख ही आपल्याला जन्मतः होते. त्यामुळेच दुधाचे फायदे आणि त्याचे उपयोग हे आपल्याला कळत नकळतपणे माहीत असतात. खासकरून एकत्र कुटूंबपद्धतीने आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या. खासकरून आपल्या घरातील आजी, काकू, मामी, मावशी यांच्याकडे छोट्या छोट्या दुखण्यांवर घरगुती इलाज असायचे. आता मात्र तसे राहिले नाही.
आपल्या राहणीमानाच्या सवयी बदलल्या आणि एकत्र कुटूंबपद्धतीही नष्ट झाली. लहानपणी बरेचदा खोकला झाल्यावर आपल्यापैकी अनेकांनी हळदीचे दूध नक्कीच घेतले असणार. परंतु हळदीचे दूध हे आपल्या आहारामध्ये केवळ आताच नाही तर खूप वर्षांपासून आहे.
Health Tips- सकाळी रिकाम्या पोटी ‘हा’ पदार्थ खा, आरोग्यासाठी मिळतील अगणित फायदे
हळद घालून दूध का प्यायला हवे?
झोपेचा त्रास असतो त्यांच्यासाठी सुद्धा हे दूध खूपच परीणामकारक आहे. प्राचीन काळी लोक झोपेच्या आधी हळदीचे दूध पिऊन झोपायचे. निद्रानाशची समस्या असल्यास झोपण्यापूर्वी दररोज रात्री हळद असलेले दूध प्यायलाच हवे.
महिलांमध्ये सांधेदुखीचे प्रमाण हे खूप बळावते. अशावेळी हळदयुक्त दुधाचे सेवन सांधेदुखीपासून मुक्त होण्यासाठी केले जाऊ शकते.
हाडांच्या मजबूतीसाठी सुद्धा हळदीचे दूध परीणामकारक उपाय आहे. हळद आणि दूध दोन्हीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते, म्हणून दिवसातून दोनदा हळद असलेले दूध पिल्याने हाडे मजबूत होतात.
Health Tips – दुधात ‘ही’ पावडर घाला, फायदे जाणून थक्क व्हाल वाचा
रक्तशुद्धीसाठी सुद्धा हळदीचे दूध हे खूप परीणामकारक मानले गेले आहे. त्याचबरोबरीने सर्दी आणि खोकल्यावर जालीम उपाय म्हणून हळदीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जातो.
हळदीमुळे आपली पचनशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच आपल्या शरीरातील आंतर आणि बाह्य भागावरील इजांसाठी हळद ही फार गरजेची मानली जाते. बाह्य किंवा अंतर्गत भागावर इजा झाल्यास लगेच हळद असलेले दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. हळदीच्या दुधात असलेले गुणधर्म विषाणू शरीरात वाढू देत नाहीत आणि जखम लवकर बरी करतात.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)