गणेशोत्सवात यंदा सात दिवस रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपक

यंदाच्या गणेशोत्सवात सात दिवस रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत परवानगी देण्यात आली आहे. याबाबत गणेश मंडळ, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून प्रशासन निर्णय घेणार आहे. गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत शेलार यांनी ही माहिती दिली.