
स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याकडील वेल्हे तालुका आता राजगड या नावाने ओळखला जाणार आहे. वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड करण्याचा निर्णय आज महसूल विभागाने घेतला. त्याला केंद्राने मान्यता दिली आहे. लवकरच त्यासंदर्भात राजपत्र जारी करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार राजगडावरून केला होता.