समुद्रकिनारी चप्पल घालून गेलात तर भरावा लागेल भूर्दंड; परदेशात आहेत काही अजब नियम…

उन्हाळ्याची किंवा दिवाळीची सुट्टी पडली की आपण फिरायला जाण्याचा बेत आखतो. काहीजण आपल्या कुटुंबासोबत महाराष्ट्रातच फिरायला जातात. पण काही जण परदेश दौऱ्यावर जातात. तुम्ही देखील जर यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत परदेश दौऱ्यावर जाणार असाल तर तिथल्या काही नियमांबद्दल जाणून घेणे आवश्य़क आहे.

तुम्ही सहकुटुंब जर युरोपला जाण्याचा बेत आखलात तर तेथील काही नियम जाणून घ्या, अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. युरोपमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांवर सरकारने दंड आकारला आहे. जर तुम्ही सुट्ट्यांमध्ये युरोपला गेलात. तेथील समुद्र किनारी जाण्याचा बेत आखलात तर जाताना चप्पल सोबत ठेवू नका. जर तुम्ही युरोपीय शहरातील पर्यटनस्थळी चप्पल घालून गेलात तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागेल.इतकेच नाही तर युरोपच्या समुद्रकिनाऱ्यांवरून तुम्ही खडे, शिंपले गोळा करुन घेण्याचा प्रयत्न केलात तरी देखील तुम्हाला दंड भरावा लागेल.

समुद्र किनाऱ्यावर स्विमींग सूट परिधान करण्यावरही बंदी आहे. बार्सिलोना, अल्बुफेरा, स्प्लिट, सोरेंटो, कान्स आणि व्हेनिस या शहरांमध्ये समुद्रकिनाऱ्यावर बाथिंग सूट परिधान करणाऱ्या लोकांना $१,७४७ पर्यंत दंड होऊ शकतो. युरोपमध्ये, विमानाने प्रवास करताना नियमांचे पालन न केल्यासही दंड आकारला जातो. युरोपमध्ये विमानाचे पूर्णपणे लॅंडिंग होण्यापूर्वी तुम्ही तुमचा सीट बेल्ट काढला तरीही तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल. तसेच मॅलोर्का, इबीझा, मॅगालुफ आणि कॅनरी बेटांमध्ये, पर्यटकांना रस्त्यावर दारू पिल्याबद्दल $3,495 चा दंड होऊ शकतो

स्पेनमध्ये, पूल चेअरवर टॉवेल जास्त वेळ ठेवल्यास $291 चा दंड होऊ शकतो. पूलमधून बाहेर पडल्यानंतर तुम्ही ओला टॉवेल तिथेच ठेवू शकत नाही. तर स्पेन, ग्रीस, इटली, फ्रान्स आणि पोर्तुगाल हे काही देश आहेत जे गाडी चालवताना फ्लिप-फ्लॉप घालणाऱ्यांवर कारवाई करत आहेत आणि या गुन्ह्यासाठी $349 दंड आकारत आहेत.