
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे ९३१ कोटी रुपयांहून अधिक संपत्तीसह हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या केवळ १५ लाख रुपयांच्या संपत्तीसह सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्री आहेत.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि नॅशनल इलेक्शन वॉच (NEW) यांनी ३० डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. २७ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांच्या सर्व ३० विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या प्रतिज्ञापत्रांचे विश्लेषण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीत लढण्यापूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांवरून ही माहिती घेण्यात आली आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे.
सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री:
- एन. चंद्राबाबू नायडू (आंध्र प्रदेश): ९३१ कोटी रुपये
- पेमा खांडू (अरुणाचल प्रदेश): ३३२ कोटी रुपये
- सिद्धरामय्या (कर्नाटक): ५१ कोटी रुपये
- नेफ्यू रियो (नागालँड): ४६ कोटी रुपये
- मोहन यादव (मध्य प्रदेश): ४२ कोटी रुपये
सर्वात कमी संपत्ती असलेले मुख्यमंत्री
- ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल): १५ लाख रुपये
- उमर अब्दुल्ला (जम्मू आणि काश्मीर): ५५ लाख रुपये
- पिनाराई विजयन (केरळ): १.१८ कोटी रुपये
- भजनलाल शर्मा (राजस्थान): १ कोटी रुपये
- योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश) १.५४ कोटी रुपये