मिझोरममध्ये पहिल्यांदाच पोहोचणार रेल्वे

मिझोर येथे पहिल्यांदाच रेल्वे पोहोचणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 सप्टेंबर रोजी मिझोरमची राजधामनी आयझॉल येथे बैराबी-सैरांग रेल्वेमार्गाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर आयझॉल पहिल्यांदाच हिंदुस्थानच्या रेल्वे नेटवर्कशी जोडला जाईल. हा मार्ग 51.38 किमी लांबीचा असून तब्बल 48 बोगदे आणि अनेक लहान-मोठे पूल आहेत. तसेच त्याच्या 196 क्रमांकाच्या पुलाची उंची दिल्लीच्या कुतुबमिनारपेक्षा अधिक आहे.

सैरंग रेल्वे स्थानक जागतिक दर्जाचे सुविधा केंद्र म्हणून विकसित केले जाईल. त्यानंतर या रेल्वे स्थानकावरून राजधानी एक्स्प्रेस सेवादेखील सुरू करण्यात येणार आहे. हा रेल्वे प्रकल्प केंद्राच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीचा एक भाग आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये चांगली कनेक्टिव्हिटी आणि आर्थिक विकासाला चालना देणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट असल्याच मिझोरमचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी दिली.

पुलाची उंची 104 मीटर

रेल्वे मार्गातील बोगद्यांची लांबी 12.8 किलोमीटर आहे. शिवाय या मार्गात 55 मोठे आणि 87 लहान पूलही आहेत. 196 क्रमांकाच्या पुलाची उंची दिल्लीच्या कुतुबमिनारपेक्षा अधइक आहे. या पुलाची उंची 104 मीटर असून हा प्रकल्प ईशान्येकडील व्यापारासह पर्यटनाला एक नवीन दिशा देईल.