
एका तरुणाने रिक्षाचं भाडं नाही दिलं, म्हणून रिक्षाचालकाने या तरुणाला जबर मारहाण केली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मुंबई पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एका तरुण रिक्षातून प्रवास करत होता. पण प्रवासात त्याचे पैसे हरवले. रिक्षातून उतरल्यावर या तरुणाने आपले पैसे हरवल्याचे सांगितले. पण चालक या तरुणावर चांगलाच चिडला आणि त्याने तरुणाच्या कानशिलात लगावली. हा तरुण रिक्षा चालकाच्या पाया पडत होता पण चालकाने तरी त्याचा कानाखाली मारली. दरम्यान या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. आरोपीला शोधून त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.
सदरच्या शाळकरी मुलाचे पैसे हरवल्यामुळे रिक्षा प्रवासाचे पैसे न दिल्यामुळे रिक्षा चालक थेरड्याने विद्यार्थी पैसे नाहीत माफ करा म्हणत असताना देखील मारहाण केल्याचे दिसते
आमची महाराष्ट्र पोलिसांना विनंती आहे
याला असा धडा शिकवा की या वयात ही याला याचा बाप आणि याचे आजोबा आठवले… pic.twitter.com/bm5PpWs5pj— दत्ता चौधरी (@DattaChoud73764) August 24, 2025