
देशातील अनेक भागात एअरटेल सेवेला फटका बसला. एअरटेलची सेवा काही ठिकाणी बंद पडली. यामुळे ग्राहकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. बंगळुरू, हैदराबाद आणि कोलकातासह काही शहरांत युजर्सला नेटवर्क आणि इंटरनेट मिळण्यास अडचण येत होती. एका आठवड्यात दुसऱ्यांदा एअरटेलची सेवा बंद पडण्याची घटना घडली. याबद्दल एअरटेलकडून स्पष्टीकरण आले असून ही समस्या तात्पुरत्या कनेक्टिव्हिटीमुळे येत आहे. मोबाईल रिस्टार्ट केल्यानंतर ही समस्या जाईल, असे गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असे म्हटले.