
बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस आल्यानंतर याचा गैरफायदा उबर कंपनीने घेतलेला दिसत आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून या पोस्टच्या दाव्यानुसार, उबरने अवघ्या एका किलोमीटरच्या अंतरासाठी तब्बल 425 रुपये भाडे आकारले आहे. उबरने इतके मोठे भाडे दाखवल्याने प्रवाशाने पायी जाण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे बंगळुरूवासीयांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
बंगळुरूमध्ये नेहमी पावसाळ्यात पाऊस झाल्यानंतर, ट्रफिक जॅम झाल्यानंतर कॅब आणि ऑटोचे भाडे अवाच्या सवा आकारले जाते. रस्त्यावर प्रचंड खड्डे, रस्त्यावरचे अर्धवट कामे आणि पाऊस आल्यानंतर वाढणाऱ्या भाड्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो, असे अनेकांनी म्हटले आहे. या पोस्टवर अनेकांनी आपला संताप व्यक्त केला आहे. एका युजरने म्हटले की, आता ऑटो खरेदी करण्याची योग्य वेळ आलीय.