
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनावेळी विधानसभेमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रार्थना गीत म्हटले. यामुळे सत्ताधारी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. शिवकुमार यांनी त्यांच्या कृत्याबाबत माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांनी केली आहे, तर कुनिगल मतदारसंघाचे आमदार एच. डी. रंगनाथ यांनी शिवकुमार यांना पाठिंबा दिला.
21 ऑगस्ट रोजी कर्नाटक विधानसभेमध्ये चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या चेंगराचेंगरीवर चर्चा सुरू होती. यावेळी भाजप आमदार आर. अशोक यांनी शिवकुमार यांच्याकडे बोट दाखवत या चेंगराचेंगरीची जबाबदारी सरकारने घ्यावी अशी मागणी केली. याला उत्तर देताना शिवकुमार त्यांना उत्तर दिले. यावेळी त्यांनी आएसएसच्या प्रार्थना गीतातील काही ओळी म्हटल्या. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
माफी मागा!
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांनी उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी माफी मागावी अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री म्हणून आरएसएसचे गीत गायला काही हरकत नाही, परंतु काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून शिवकुमार यांनी अशी कृती करणे योग्य नाही. त्यांनी माफी मागावी, असे हरिप्रसाद म्हणाले. भाजप शिवकुमार यांच्या कृतीचे स्वागत करेल, पण देशात आतापर्यंत 3 वेळा आरएसएसवर बंदी घालण्याली आहे. जर शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून हे गीत म्हटले असते तर कोणताही आपेक्ष नसता. सरकार सर्वांचे असून त्यात चांगल्या, वाईट व्यक्तींचाही समावेश आहे. परंतु काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून ते आरएसएसचे प्रार्थना गीत म्हणून शकत नाही. महात्मा गांधींच्या हत्येस आरएसएसएचे सदस्य जबाबदार होते, असे म्हणत हरिप्रसाद यांनी शिवकुमार यांना माफी मागण्यास सांगितले.
शिवकुमार यांच्यासाठी वेगळे नियम
दुसरीकडे माजी मंत्री के. एन. राजन्ना यांनी शिवकुमार यांच्यासाठी पक्षात वेगळे नियम लागू असल्याची खोचक टीका केली. शिवकुमार आरएसएसचे प्रार्थना गीत गाऊ शकतात, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात किंवा महाकुंभमेळ्यालाही जाऊ शकता. मग भलेही ते पक्षाच्या हिताविरुद्ध असो, अशी टीका राजन्ना यांनी केली.
कर्नाटकात डी शिवकुमार यांना मुख्यमंत्री करा, 100 हून अधिक आमदारांची काँग्रेस नेत्यांकडे मागणी
रंगनाथ यांनी केले समर्थन
शिवकुमार यांचे निकटवर्तीय काँग्रेस आमदार एच. डी. रंगनाथ यांनी त्यांचे समर्थन केले आहे. शिवकुमार यांनी विधानसभेमध्ये हे गीत गायल्यानंतर मी त्याचा अर्थ तपासला. तुम्हाला जन्म देणाऱ्या भूमीला अभिवादन करण्याबद्दल त्यात लिहिण्यात आले असून त्यात चुकीचे काही नाही. आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष असून चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजे. मात्र काँग्रेस आणि आरएसएसची विचारधारा कधीही जुळणार नाही, असे रंगनाथ म्हणाले.
…तर राजकारण सोडून देईन! कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचं भाजपला आव्हान