गणपती बाप्पा मोरया 2025 – बाप्पाला नैवेद्यासाठी बनवा साधे सोपे झटपट होणारे मोतीचुरासारखे दिसणारे लाडू

बाप्पांचं घरी आगमन झाल्यानंतर गोडाचे खूप सारे पदार्थ घरोघरी बनतात. अशावेळी मोदकांशिवाय काही नवीन गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर मोतीचुर लाडू हा एक उत्तम पर्याय आहे. हे लाडू करण्यासाठी वेळही कमी लागतो. शिवाय घरी येणाऱ्या पाहुण्यांना प्रसाद म्हणून देण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे.

गणपती बाप्पा मोरया 2025 – लहानांच्या आवडीचे चॉकलेट मोदक करण्यासाठी लागेल फक्त अर्धा तास

 

साहित्य (5 लाडवांचे प्रमाण)
1 कप चणाडाळ
1 कप साखर
1/2 कप पाणी
1 टीस्पून वेलची पावडर
2 चिमटी खाण्याचा रंग
3-4 टेबलस्पून साजूक तूप
2 टेबलस्पून तळलेले काजू
पिस्ते सजावटीसाठी
तळण्यासाठी तेल/तूप

 

गणपती बाप्पा मोरया 2025 – अशा पद्धतीने मोदक करा टिकतील तब्बल 10 दिवस

कृती

प्रथम दोन ते तीन वेळा चणा डाळ स्वच्छ धुऊन घ्या नंतर त्यामध्ये पाणी घालून चणाडाळ २-3 तास भिजवून झाकून ठेवा. नंतर डाळीमधले पाणी चाळणीत घालून निथळत ठेवा. चणाडाळीमधले पाणी संपूर्णपणे निथळले की मिक्सरमध्ये ही चणा डाळ घालून पल्स मोड वर ठेवून ऑन ऑफ करा. असे एकूण फक्त चार वेळा करा म्हणजे चणाडाळ रवाळ दळली जाईल.

आता एका पॅनवर थोडे साजूक तूप किंवा तेल घाला.. या रवाळ दळलेल्या चणाडाळीच्या पसरट पातळ टिक्या करा आणि त्या टिक्क्या मंद आचेवर ३ते ४ मिनिटे दोन्ही बाजूने फ्राय करून घ्या.आपल्याला हलकेच भाजायच्या आहेत..crispy, सोनेरी होईपर्यंत भाजायच्या नाहीत.. अशाप्रकारे सगळ्या टिक्क्या फ्राय करून टीशू पेपरवर काढा.

गणपती बाप्पा मोरया 2025 – झटपट होणारे शाही मोदक करा घरच्या घरी, वाचा

आता या टिक्क्या थंड झाल्यावर तोडून घ्या आणि परत मिक्सरमध्ये घालून पल्स मोडवर फक्त चार वेळा फिरवा म्हणजे टिक्क्या रवाळ दळल्या जातील आणि मोतीचूर लाडवासारखी बारीक बुंदी तयार होईल..आता एका पसरट भांड्यात साखर व अर्धा कप पाणी घालून एकतारी पाक करून घ्या,त्यात वेलची पूड आणि खायचा रंग घाला आणि..गॅस बंद करा.

आता चणा डाळीचे दळलेले मिश्रण हळूहळू या पाकात सोडा, आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या.आता परत गॅस सुरू करा आणि मंद आचेवर लाडवाचे मिश्रण थोडे कोरडे होईपर्यंत म्हणजेच चार ते पाच मिनिटे भाजून घ्या.. नंतर गॅस बंद करुन लाडवाचे मिश्रण झाकून ठेवा म्हणजे लाडवाच्या मिश्रणात पाक चांगला मुरेल.

काजू थोडयाशा तुपात थोडे फ्राय करून काढा. आता पाक पूर्णपणे शोषून घेतला की लाडू वळायला घ्या (जर मिश्रण हाताला चिकटत असेल तर थोडे गरम तूप घालून मिक्स करा व लाडू वळा) लाडू वळताना एकेक काजू लावून लाडू वळा वरून पिस्त्याचे काप लावून सजावट करा.

हे लाडू अगदी दिसायला बुंदी पाडून केलेल्या मोतीचुर लाडूसारखेच दिसतात व लागतातही.