
पंजाबमध्ये सुरू असलेल्या पावसाच्या तुफानामुळे प्रशासनाने सर्व महाविद्यालये, शाळा बंद ठेवगाचे आवाहन केले होते. मात्र, हे आवाहन धुडकावत गुरुदासपूरमधील डाबुरीत नवोदय शाळा सुरूच ठेवली. मात्र, हा निर्णय शाळेच्या चांगलाच अंगलट आला असून, नवोदय निद्यात्तमात ४०० हुन अधिक विद्यार्थी आणि शिक्षक पुरात अडकले आहेत. शाळेचा तळमजला ५ फूट पाण्याने भरल्याने सर्वांना पहिल्या मजल्यावर ठेवण्यात आले आहे. एनडीआरएफ, प्रशासन आणि लष्कराच्या मदतीने सर्वांना सुरक्षितस्थळी हलविले. आता प्रशासनाने ३० ऑगस्टपर्यंत शाळांना सुटी जाहीर केली आहे.
गेल्या आठवडाभरापासून पंजाबमध्ये सततच्या पावसामुळे या दुथडी भरून वाहत आहेत. धरणांमधून पाणी सोडल्यामुळे पठाणकोट, गुरुदासपुर, तरणतारण, होशियारपुर, कपूरथळा, फिरोजपूर आणि फाजिल्का येथे पूर आल्याचे पहायला मिळाले. रावी नदीतील पुरामुळे, कर्तारपूर साहिब कॉरिडॉरमध्येही ७ फूट पाण्याचा पूर आला आहे. यामुळे पाकिस्तानमधील श्री कर्तारपूर साहिब गुरुद्वारा देखील पाण्याखाली गेला आहे. कर्तारपूर कॉरिडॉर हा ४.७ किलोमीटर लांबीचा रस्ता असून, डेरा बाबा नानक यांना पाकिस्तानातील कर्तारपूर साहिन गुरुद्वाराशी थेट जोडतो. दुसरीकडे, पंजाबमधील पठाणकोट येथील माधोपुर हेडवर्क्स येथे पुराच्या पाण्याने वेढलेल्या एका जीर्ण इमारतीतून लष्कराने हेलिकॉप्टरद्वारे 22 सीआरपीएफ जवान आणि तीन नागरिकांना वाचवले, बचाकसाठी, लष्कराचे हेलिकॉप्टर एका जीर्ण इमारतीच्या छतावर उतरले. छतावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच इमारतीचा पुढचा भाग पाण्यात बुडाला. त्यानंतरही, लष्कराने जीर्ण इमारतीच्या छतावर अडकलेल्या सर्व लोकांना वाचवले. भारतीय लष्कराने बचाव कार्याचा व्हिडिओ ‘एक्स’वर शेअर केला आहे.
अनेक राज्यांत पाऊस केंद्रीय हवामान विभागाचा इशारा
देशभरात अनेक राज्यांत पावसाचे सत्र सुरू असताना केंद्रीय हवामान विभागाने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे अगोदरच संकटात सापडलेल्या नागरिकांत पावसाची भीती पसरली आहे. उत्तर हिंदुस्थानसह अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब व हरयाणा आणि हिमाचल प्रदेशचा समावेश आहे. उत्तराखंड राज्यातील डेहराडून, नैनीताल आणि बागेश्वर या भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. राजस्थानमध्ये गेल्या काही दिवसांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे, असाच पाऊस पुढे काही दिवस शुरू राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, दक्षिण हिंदुस्थान, पूर्व व उत्तर हिंदुस्थानमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दित्य आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये अनेक राज्यांमध्ये जोरदार फऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे