हवाई हल्ल्यानंतर इस्रायलचा सीरियात सैनिकी छापा; चार हेलिकॉप्टर व दोन लढाऊ विमाने उतरली

इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कसला लक्ष्य केले आहे. हवाई हल्ले व बॉम्बवर्षावानंतर इस्रालयने सीरियाच्या भूमीवर सैनिकही उतरवले आहेत. हा छापा असल्याचे इस्रायलने म्हटले आहे.

सीरियाने यास दुजोरा दिला आहे. दमास्कसपासून जवळ असलेल्या तल मानेह येथे इस्रायलने हा छापा टाकला. छाप्यासाठी इस्रायलने 4 हेलिकॉप्टर आणि दोन लढाऊ विमानांचा वापर केला. इस्रायलने जिथे छापा टाकला त्या ठिकाणी पूर्वी सीरियन सैन्याचा तळ होता. इराणकडून या लष्करी तळाचा वापर केला जात असल्याने इस्रायलने आधीच हा तळ उद्ध्वस्त केला आहे. मात्र तिथे आजही सीरियाचे सैनिक तैनात असतात. या तळावर बुधवारी इस्रायलने बॉम्बहल्ले केले होते. त्यानंतर आता सैनिक उतरवले आहेत. सैनिक उतरवण्यामागचे कारण अद्याप समोर आलेले नाही.