Mumbai news – म्हाडाच्या 149 दुकानांचा लिलाव आता 10 सप्टेंबरला

म्हाडाच्या मुंबईतील दुकानांच्या ई लिलावाला मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार 10 सप्टेंबरला ई लिलाव होणार असून 11 सप्टेंबरला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 149 दुकानांसाठी आतापर्यंत 550 अर्ज आले आहेत.

दुकानांच्या ई लिलावात मुलुंड गव्हाणपाडातील 6, कुर्ला- स्वदेशी मिलमधील 5, तुंगा पवईतील 2, कोपरी पवईतील 23, चारकोपमधील 23, जुने मागाठाणे येथील 6, महावीर नगर कांदिवलीमधील 6, प्रतीक्षा नगर येथील 9, अँटॉप हिल येथील 3, मालवणी येथील 46, गोरेगावच्या बिंबिसार नगरमधील 17 तसेच शास्त्री नगर, सिद्धार्थ नगर आणि जोगेश्वरी मजासवाडीतील प्रत्येकी एका दुकान विक्रीसाठी उपलब्ध आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, ई-लिलावाकरिता https://eauction.mhada.gov.in संकेतस्थळावर नोंदणी, ऑनलाईन अर्ज, कागदपत्रे अपलोड आणि अनामत रक्कम ऑनलाईन भरण्यासाठी आता 8 सप्टेंबरला रात्री 11.59 वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

म्हाडाच्या 5,285 घरांच्या सोडतीला मुदतवाढ; 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार, 9 ऑक्टोबरला संगणकीय सोडत