
येमेनच्या राजधानी सनआमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात हुथी पंतप्रधान अहमद अल-राहवी यांचा मृत्यू झाला आहे. हुथी गटाने शनिवार जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली असून, गुरुवार (२८ ऑगस्ट) रोजी झालेल्या हल्ल्यात अल-राहवी यांच्यासोबत इतर काही मंत्रीही मारले गेले आहेत. हा हल्ला इस्रायलने येमेनमधील हुथींच्या मिसाइल आणि ड्रोन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून केला होता.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, इजरायली हवाई दलाने येमेनच्या राजधानी सनाआमधील एका कार्यशाळेवर हल्ला केला. ही कार्यशाळा हुथी अधिकाऱ्यांसाठी सरकारच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित केली गेली होती. या हल्ल्यात पंतप्रधान अहमद अल-रहावी यांच्यासह इतर काही मंत्र्यांचा मृत्यू झाला.
हुथी गटाने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, या हल्ल्यात अहमद अल-रहावी आणि इतर मंत्र्यांचा समावेश असलेल्या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला हुथी गटाच्या लष्करी तळांवर आणि राष्ट्रपती भवनावरही केला गेला, ज्यामुळे किमान १० हूती कमांडरचा मृत्यू झाला आणि ९० हून अधिक जखमी झाले आहेत.