
गांजा तस्करीत सहभाग आढळल्याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने साफेमा आणि एनडीपीएस कायद्यातील तरतुदीनुसार एका ड्रग्ज माफियाच्या अडीच कोटी रुपयांच्या अचल व स्थावर मालमत्ता गोठवली आहे.
एनसीबीच्या मुंबई युनिटने आहिल्यानंतर येथील पाथर्डीमध्ये कारवाई करत 111 किलो गांजा पकडला होता. आंध्रा-ओरिसा बॉर्डरहून हा गांजा तस्करी करून आणण्यात आला होता. या तस्करीचा म्होरक्या व मास्टरमाईंड हा पुण्यात बसून हे सिंडिकेट चालवत असल्याचे एनसीबीच्या चौकशीत समोर आले होते. याची गंभीर दखल घेत एनसीबीने गांजा तस्करीप्रकरणात अटक केलेल्या मुख्य आरोपीची अडीच कोटीची मालमत्ता गोठवली आहे. त्यात तीन बँक खाती गोठवली असून एक महिंद्रा थार तसेच उरळी कांचन येथील जमिनीचा समावेश आहे.