
येवला शहरातील गल्लीत असलेल्या ‘सुरेखा पैठणी’ दुकानातून दीड ते दोन लाख रुपये किमतीच्या पैठणी साडी चोरून नेल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पंकज तिवाणे आणि जितेंद्र कर्हेकर यांच्या मालकीचे असलेल्या ‘सुरेखा पैठणी’ शोरूम मध्ये आज सोमवारी ही घटना घडली. दीड ते दोन लाख रुपये किमतीच्या पैठणी साडी स्वतःच्या अंगात घातलेल्या साडीमध्ये लपवून चोरतांना घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दुकानात आलेल्या या दोन महिला ग्राहकांनी दुकानदाराला बोलण्यात गुंतवून महागडी पैठणी चोरली आहे.