ट्रेंड -गर्दीची ‘श्रीमंती’

उत्सव म्हटलं की उत्साह आणि उत्साह म्हटलं की गर्दी. महाराष्ट्रात सध्या गणपती बाप्पाचा महाउत्सव सुरू आहे. शहरं आणि गावं गणेशभक्तांनी फुलून गेली आहेत. सार्वजनिक गणपतींचं दर्शन घेण्यासाठी तोबा गर्दी होत आहे. मुंबई, पुण्यातील प्रसिद्ध गणेश मंडळांच्या बाप्पाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

श्रद्धाळूंच्या या गर्दीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या प्रख्यात दगडूशेठ हलवाईच्या गणपतीच्या दर्शनासाठी झालेल्या गर्दीनं नवा ट्रेंड सेट केला आहे. या गणपतीच्या दर्शनासाठी शनिवारी मध्यरात्री झालेल्या गर्दीनं उच्चांक मोडल्याचं बोललं जातंय. बाप्पावरील श्रद्धेनं हा उत्सव अधिक श्रीमंत झाला आहे.