
उत्तर प्रदेशातील संदीप कुमारचे अबुधाबीत नशीब पालटले. एका रात्रीत संदीप कुमार कोटय़धीश झाला. त्याला 35 कोटींची लॉटरी लागली. संदीप कुमार मागील तीन वर्षांपासून यूएईमध्ये काम करत आहे. तो दुबई ड्राईडॉक्समध्ये टेक्निशिअनची नोकरी करतो. गेल्या काही दिवसांपासून संदीपने लॉटरी काढायला सुरुवात केली होती. त्याने अबुधाबी बिग तिकीट सीरिजमध्ये लॉटरी जिंकली. इतर 20 जणांसोबत ग्रुपमध्ये त्याने लॉटरी तिकीट काढले होते. 3 सप्टेंबर रोजी लॉटरी फुटली आणि त्याच्या नशिबाचा दरवाजा उघडला. दररोज मशीनवर काम करणारा 30 वर्षीय संदीप एकाएकी मालामाल झाला. आता हिंदुस्थानात परतण्याचा त्याचा विचार आहे.