त्रिभाषा धोरण समितीचे सदस्य जाहीर

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीच्या सदस्यांच्या नावांची आज अखेर घोषणा करण्यात आली. राज्य शासनाने 30 जून रोजी या समितीच्या अध्यक्षपदी शिक्षणतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांची नियुक्ती केली होती. या समितीत सदस्य म्हणून भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक डॉ. वामन केंद्रे, पुण्यातील शिक्षणतज्ञ डॉ. अपर्णा मॉरीस, पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या भाषा विज्ञानप्रमुख प्रा. सोनाली कुलकर्णी-जोशी, छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षणतज्ञ डॉ. मधुश्री सावजी, पुणे येथील बालमानसतज्ञ डॉ. भूषण शुक्ल तसेच राज्य प्रकल्प संचालक संजय यादव यांचा समावेश करण्यात आला आहे.