
वडाळा पूर्व येथील नाडकर्णी पार्कचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमुळे दिल्लीतून मुंबईत येऊन हरवलेला अल्पवयीन विशेष मुलगा वडिलांना सापडला. 28 ऑगस्टला हा मुलगा कार्यकर्त्यांना मंडपाच्या परिसरात अन्नाच्या शोधात भटकताना दिसला. मुलाच्या हातावर गोंदलेल्या मोबाईल क्रमांकावरून कार्यकर्त्यांनी त्याच्या वडिलांशी संपर्प साधला. वडाळा पोलिसांच्या मदतीने त्याला एका शेल्टर होममध्ये देखरेखीखाली ठेवले. त्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या मुलाला सुखरूप वडिलांच्या स्वाधीन केले. कार्यकर्त्यांच्या या जागरुकतेचे कौतुक होत आहे.
मुंबईच्या विकासात मोलाचे योगदान असलेल्या, 152 वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेल्या मुंबई बंदर प्राधिकरणाच्या (बीपीटी) वडाळा येथील नाडकर्णी पार्क येथील बीपीटी काॅलनीचा गणेशोत्सव यंदा हीरक महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.
नुकतीच शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई यांनी मंडळाला भेट दिली. यावेळी विमा कर्मचारी सेनेचे सरचिटणीस दिनेश बोभाटे, शिवसेना सचिव प्रवीण महाले, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनपुटकर, सहकार्याध्यक्ष किशोर घाडी, सहसरचिटणीस राजेश दुबे, उपाध्यक्ष संदीप चेरफळे, संतोष म्हात्रे, राकेश भाटकर, प्रशांत वारेकर, शीव विधानसभा संघटक आनंद जाधव, उपविभागप्रमुख राजेश पुचेकर, निरीक्षक शिवाजी गावडे, शाखाप्रमुख सचिन खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यकर्त्यांचा सन्मान
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दाखविलेल्या जागरूकतेचे काwतुक केले आहे. मंडळाचे खजिनदार, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीचे कोषाध्यक्ष अजित झाझम, नरेश अहिरे, किशोर कदम, तन्मय काळे, अनिमेश मोकल, विकास केटी, गणेश घाडीगावकर, वरुण कडवे, आदित्य गायकवाड, आशीष गायकवाड या कार्यकर्त्यांचे अनिल देसाई यांनी अभिनंदन करून सन्मान केला.