
ब्रिटनच्या उपपंतप्रधान एँजेला रेयनर यांनी आज आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. रेयनर यांनी अलीकडेच खरेदी केलेल्या घरावरील मालमत्ता कर त्यांनी भरलेला नसल्याचे अंतर्गत चौकशीच्या अहवालात समोर आले. त्यानंतर लगेचच रेयनर यांनी राजीनामा दिला. त्या मजूर पक्षाच्या शक्तिशाली नेत्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्यावर मंत्र्यांसाठीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा ठपका होता.