घरगुती गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर; ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ देखाव्यासाठी अक्षय पवार ठरले विजेते, शिवसेना शाखा क्र. 203च्या वतीने आयोजन

शिवसेना शिवडी विधानसभेचे आमदार अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा क्र. 203च्या वतीने घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ या देखाव्यासाठी सुधाम भुवन येथील अक्षय पवार यांना पहिले पारितोषिक जाहीर झाले. ‘चाळ संस्पृती आणि सण’ या देखाव्यासाठी कृष्ण नगर, जेठाबाई येथील सचिन मणियार यांना दुसरे तर ‘गुंफा शंकर पिंड’ या देखाव्यासाठी त्रिवेणी सदन येथील प्रकाश पडवळ यांना तिसरा क्रमांक मिळाला.

या स्पर्धेत एपूण 183 स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जागृती काले यांना प्रथम उत्तेजनार्थ तर निखिल साळसकर यांना द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले. या उपक्रमाला शिवसेना सचिव सुधीर साळवी आणि विभागप्रमुख आशीष चेंबुरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच उपविभागप्रमुख  गजानन चव्हाण, पराग चव्हाण, शाखाप्रमुख मिनार नाताळकर, शाखा संघटक भारती पेडणेकर, शाखा समन्वयक दिव्या बडवे यांच्या सहकार्याने, परळची देवी मंडळाचे कार्याध्यक्ष राजन म्हाडगुत आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश धाऊसकर यांच्या प्रमुख आयोजनाखाली हा उपक्रम पार पडला. उपशाखाप्रमुख ज्ञानेश शिर्पे आणि राजेश परब तसेच अनिकेत तुलसकर, मंगेश जगताप आणि प्रमोद मुळदेकर यांनीही मोलाचे योगदान दिले.