बोको हरामचे नायजेरियात थैमान, 60 जणांची हत्या

दहशतवादी संघटना बोको हरामने नायजेरियातील बोर्नो राज्यातील एका गावात हल्ला करून 60 जणांची हत्या केली, तर 100 घरे पेटवून दिली. या हल्ल्यानंतर राज्याचे गव्हर्नर बाबागानो जुलूम यांनी घटनास्थळाची पाहणी करत गावकऱ्यांना धीर दिला. सरकार गावाला पूर्ण सुरक्षा व मदत देईल. कोणीही आपले घर सोडून जाऊ नये, असे आवाहन जुलूम यांनी केले.