सलमान खान घाणेरडा आणि गुंड प्रवृत्तीचा माणूस; दबंग’च्या दिग्दर्शकाने केले भाईजानच्या फॅमिलीवर आरोप

बॉलीवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान आणि कॉन्ट्रॉवर्सी एक समीकरण बनले आहे. त्यामुळे तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत राहिलाय. सलमान खानने बॉलीवूडला अनेक हिट चित्रपट दिले. चित्रपटातील त्याच्या गाण्यांचे आजही चाहत्यांमध्ये तितकीच क्रेझ आहे. ‘दबंग’या चित्रपटाला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने चित्रपट निर्माते अभिनव कश्यप याने पुन्हा एकदा सलमानवर निशाणा साधला. सलमान खान एक गुंड प्रवृत्तीचा आणि एक वाईट व्यक्ती असल्याचा आरोप केला आहे.

सलमान खानचा दबंग हा चित्रपट 2010ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील त्याचा पोलिसांच्या भूमिकेचा लूक चाहत्यांना फार आवडला होता. या चित्रपटाच्या दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सलमानवर आणि त्याच्या कुटुंबावर अनेक आरोप केले. ‘सलमान कधीही यात सहभागी होत नाही. त्याला अभिनयातही रस नाही आणि गेल्या 25 वर्षांपासून तो काम करत नाही. तो कामावर येऊन आपल्यावर जणू उपकारच करतो. त्याला सेलिब्रिटी बनण्यातच जास्त रस आहे. पण त्याला अभिनयात रस नाही. तो एक गुंड आहे. दबंगपूर्वी मला याबद्दल माहिती नव्हती. सलमान वाईट वृत्तीचा आहे. तो एक घाणेरडा माणूस आहे., असा आरोप यावेळी अभिनव यांनी केला.

जर तुम्ही त्याच्याशी सहमत नसाल तर…

अभिनव याने सलमानसोबतच त्याच्या कुटुंबावरही टीका केली. सलमान खान हा बॉलिवूडमधील स्टार सिस्टीमचा भाग आहे. तो 50 वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये असलेल्या एका कुटुंबातून आला आहे. सलमान फक्त तेच पुढे घेऊन जात आहे. पण ते त्रास देणारे लोक आहेत. जर तुम्ही त्याच्याशी सहमत नसाल तर, तो तुमच्या मागेच लागतो, असेही अभिनव कश्यप यांनी सांगितले.