
माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपविभागप्रमुख राजेश शेटये यांच्या पुढाकाराने विभागातील 100 महिलांचे महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजना, आयुष्मान कार्ड आणि स्मार्ट रेशन कार्ड वितरित करण्याचा शुभारंभ विभाग संघटक अनिता बागवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शाखा क्र. 60 च्या कार्यालयात झालेल्या या सोहळ्याला विधानसभा संघटक मेघना माने-काकडे, उपविभाग संघटक जागृती भानजी, शाखा संघटक अश्विनी खानविलकर, बेबी पाटील, संजना हरळीकर आदी उपस्थित होते.
शिक्षक दिनानिमित्ताने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, कांजूर यांच्या वतीने विभागातील शिक्षकांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष बाबा कदम यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रमेश कोचरेकर, श्वेता पावसकर, पुरुषोत्तम इंगळे, सखी नकाशे, खाशोबा मोरे, भाऊसाहेब घाडगे, विलास इंगळे, राजू शेटये, सुधीर सावंत, संतोष पासलकर, प्रकाश शिंदे, राजेश पावसकर आदी उपस्थित होते.