
गुजरातमधील कांडला येथून मुंबईत येणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाची मुंबई विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. मिळाली माहितीनुसार, स्पाइसजेट Q400 विमानाचे उड्डाणानंतर चाक निघाले. यातच खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले.
स्पाइसजेटच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, विमानाच्या इंजिनमध्ये किरकोळ समस्या आढळल्यानंतर पायलटने तात्काळ मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. विमानतळ प्रशासनाने त्वरित बचाव कार्य सुरू केले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढण्यात आले.
या घटनेमुळे मुंबई विमानतळावरील काही उड्डाणांना विलंब झाला असला तरी, परिस्थिती आता नियंत्रणात आहे. स्पाइसजेटने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, प्रवाशांना आवश्यक सहाय्य प्रदान केले जात आहे.